वेलतूर (जि. नागपूर) : वेलतूर आणि परिसरातील कोरोना विषाणूचा संसर्गजन्य रोखण्यासाठी वेलतूर ग्रामपंचायतीच्या वतीने कडक उपाययोजना करण्यात येत आहे. विनामास्क असलेल्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी शासकीय नियमानुसार दंडवसुली करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यात सध्या चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने सर्वच स्तरावर खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. यावेळी वेलतूरच्या सरपंच सविता किदर्ले, उपसरपंच प्रशांत तितरमारे, ग्रामविस्तारी हर्षवर्धन तागडे, आशा व अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
(व्हिडीओ : शरद शहारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.